अविनाश सुतार
हिवाळ्यात दही खाल्ल्याने खरंच सर्दी होते का? सर्दी टाळण्यासाठी दही कसं कोणत्या वेळी खायला हवं?
हिवाळ्यात हवामान थंड असते. दहीही शीत गुणधर्माचे असते. त्यामुळे थंड किंवा फ्रिजमधील दही खाल्ल्यास शरीराचे तापमान कमी होऊ शकते
फ्रिजमधील दही थेट खाऊ नका. यामुळे घसा खवखवणे, खोकला आणि सर्दी होऊ शकते. दही खोलीच्या तपमानावर खाणे अधिक चांगले
हिवाळ्यात जड अन्न खाल्ल्यामुळे पचन मंदावते. दही खाल्ल्याने अन्न पचण्यास मदत होते, जिरे, मिरी घालून दही खाल्ल्यास अधिक फायदेशीर ठरून अजीर्ण आणि पोटफुगी कमी होते
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. दह्यातील लॅक्टिक अॅसिड त्वचा मऊ ठेवण्यास मदत करते. दही फेसपॅक म्हणूनही वापरता येते
रात्री दही खाल्ल्याने शरीराचे तापमान कमी होते आणि कफ वाढू शकतो. त्यामुळे दही सकाळी किंवा दुपारच्या जेवणात खाणे उत्तम ठरते
दह्यातील प्रोबायोटिक्स पचनसंस्थेला बळकटी देतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी-खोकल्यासारख्या समस्या टळू शकतात
ज्यांना सर्दी-खोकला आहे त्यांनी दही कमी खावे, ज्यांना आधीच सर्दी, खोकला किंवा सायनसची समस्या आहे, त्यांनी काही काळ दही खाणे टाळावे
दह्यातील कॅल्शियम आणि जीवनसत्व 'डी' मुळे हाडे व दात मजबूत होतात, पचन सुधारते, त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते