पुढारी वृत्तसेवा
गटारी अमावस्या (गताहारी अमावस्या) ही आषाढ महिन्यातील शेवटची अमावस्या म्हणून साजरी केली जाते
या दिवशी भरपूर मांसाहाराचा आस्वाद घेतला जातो
कारण यानंतर लगेचच पवित्र असा श्रावण महिना सुरू होतो.
संस्कृतमधील 'गत' (संपलेला) आणि 'आहार' या शब्दांवरून हा शब्द आला आहे
पूर्वीचा खानपान मागे सोडून सात्त्विक आहाराकडे वळले जाते, म्हणजेच 'गताहारी' होय
काळानुसार लोकबोलीत याला 'गटारी' म्हटले जाऊ लागले.
श्रावण महिन्यात बहुतांश घरात मांसाहार, मद्यपान वर्ज्य केले जाते
त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वीच्या या शेवटच्या दिवशी मांसाहारी पदार्थ करून खाण्याची पद्धत आहे
या दिवसाला दीप अमावस्याही म्हटले जाते
या दिवशी घरातील सर्व दिवे, समई, कंदील स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते
आषाढ संपून श्रावणातील मांगल्याचे स्वागत करण्यासाठी घरातील नकारात्मकता दूर केली जाते