'या' व्याधी असलेल्यांनी चुकूनही जास्त लसूण खाऊ नका; आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

आरोग्यासाठी फायदेशीर तरीही...

लसूण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो, मात्र काही लोकांसाठी त्याचे अतिसेवन गंभीर समस्या निर्माण करू शकते.

शस्त्रक्रिया होणार असेल तर सावधान

ज्यांची लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे, त्यांनी लसूण खाणे टाळावे; कारण यामुळे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.

रक्तदाबाची समस्या (Low BP)

जर तुमचा रक्तदाब नेहमी कमी (Low BP) राहत असेल, तर लसणाचे जास्त सेवन टाळा, कारण तो रक्तदाब अधिक कमी करू शकतो.

पचनाच्या तक्रारी असलेल्या व्यक्ती

ज्यांना ॲसिडिटी, गॅस किंवा पोटाचे अल्सर आहेत, त्यांनी कच्चा लसूण खाल्ल्यास पोटातील जळजळ वाढू शकते.

यकृताच्या समस्या (Liver Issues)

यकृताशी संबंधित विकार असलेल्या लोकांनी लसणाचे सेवन मर्यादित ठेवावे, अन्यथा यकृतावर अतिरिक्त ताण येऊ शकतो.

रक्त पातळ करण्याची औषधे

जर तुम्ही रक्त पातळ होण्यासाठी औषधे घेत असाल, तर लसूण खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, कारण लसूण नैसर्गिकरित्या रक्त पातळ करतो.

गर्भवती महिलांसाठी सूचना

गर्भवती महिलांनी आहारात लसणाचे प्रमाण मर्यादित ठेवावे, कारण लसणामुळे शरीरातील उष्णता वाढून त्रास होऊ शकतो.

ऍलर्जी असल्यास काळजी घ्या

काही लोकांना लसणामुळे त्वचेवर रॅशेस किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, अशा वेळी त्याचे सेवन त्वरित थांबवावे.

येथे क्लिक