Namdev Gharal
गार्डन ईल ही एक समुद्रातील लहान मासळीप्रजाती आहे, जी मुख्यतः वाळूच्या तळाशी राहते आणि दिसायला अतिशय मजेशीर असते.
अर्धे शरीर वाळूत रुतवून अर्धे पाण्यात डोलवत असतो त्यामुळे याला "गार्डन ईल" म्हणतात.
या माशांचा देह बारीक, लांबसर आणि सरळ असतो याची लांबी ३० ते ४० सेंटीमिटर असते
गार्डन ईल मुख्यतः उष्णकटिबंधीय समुद्रांमध्ये, विशेषतः इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आढळते.
ही मासळी खोल समुद्राच्या वाळूच्या तळाशी, प्रवाळ खडकांजवळ राहतात.
हे मासे त्यांच्या शरीराचा अर्धा भाग वाळूमध्ये गाडून ठेवतात आणि वरचा भाग पाण्यातून बाहेर ठेवून प्रवाहातून प्लँकटन (छोटे जीव) पकडतात.
कोणताही धोका वाटल्यास ते क्षणात पूर्णपणे जमिनीत लपून जातात
हे अनेकदा शेकडोच्या झुडपासारख्या समूहात राहतात, ज्यामुळे समुद्रतळ काही वेळा "गार्डन"सारखा दिसतो.
गार्डन ईल ही समुद्रातील एक अद्वितीय, गूढ आणि सौंदर्यपूर्ण माशाची प्रजाती आहे.
गार्डन ईल हे डाईव्हिंग करताना विशेष आकर्षण असते.
गार्डन ईल ही समुद्रातील एक अद्वितीय, गूढ आणि सौंदर्यपूर्ण माशाची प्रजाती आहे.