Cape Sundew : ‘ही’ वनस्‍पती करते किटकांची शिकार

Namdev Gharal

Cape Sundew हे या वनस्‍पतीचे नाव असून याला शास्त्रीय नाव Drosera capensis असे आहे.

ही वनस्पती प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन परिसरात आढळते, म्हणूनच तिला "Cape" Sundew असे म्हणतात.

ही वनस्‍पती मांसाहारी आहे. छोट्या किटकांना आपल्‍याकडे आकर्षित करुन त्‍यांची शिकार करते

ही वनस्पती आकाराने लहान असून १० ते १५ सें.मी. इतकीच उंच वाढते.

या वनस्‍पतीच्या पानांवर लहान लहान केसांसारखी रचना असते, ज्यांच्या टोकाला चिकट द्रव असतो.

कीटक त्या चकचकीत द्रवाकडे आकर्षित होतात आणि एकदा चिकटले की ते सुटू शकत नाहीत. वनस्पती नंतर त्यांना हळूहळू पचवते.

किटक एकदा त्‍या पानावर येऊन चिकटला की ते पान दुमडते व त्‍या किटकाला जखडून टाकते

या वनस्‍पतीला गुलाबी, जांभळी रंगाची फुले येतात, जी सरळ खांबासारख्या देठावर फूलतात.

ही वनस्पती शैक्षणिक संशोधन, दुर्मिळ वनस्पती संग्रहासाठी, तसेच घरगुती सजावटीसाठी वापरली जाते.

वर्षभर ही वनस्‍पती हिरवीगार राहते. यामुळे नैसर्गिकरित्‍या किडीचे नियंत्रण होण्यास मदत होते.

Snow Leopard