Curd cause a cold: दही खाल्ल्याने सर्दी होते का? विज्ञान काय सांगते

पुढारी वृत्तसेवा

दही खाल्ल्याने सर्दी होते असा आपल्याकडे समज आहे. त्‍यामुळे अनेकजण दही खाणे टाळतात, पण वैज्ञानिक दृष्टीकोणातून हे खरे आहे का पाहू

तर तज्ञांच्या मते दही खाल्ल्याने थेट सर्दी होत नाही किंवा वाढत नाही. हा एक सामान्य गैरसमज आहे. उलट, शास्त्रोक्त दृष्टीने पाहिल्यास दह्याचे अनेक फायदे आहेत, पण ते खाताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

दह्यामध्ये 'प्रोबायोटिक्स' (Probiotics) म्हणजेच आपल्या शरीरासाठी फायदेशीर असणारे जिवंत बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया आपली आतड्यांची आरोग्य सुधारतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात

दही खाल्ल्याने शरीरात कफ तयार होतो किंवा सर्दी वाढते, याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

सर्दी असताना दही कसे खावे

जरी दही आरोग्यासाठी चांगले असले, तरी सर्दी झाली असल्यास थोडी काळजी घ्यावी यामध्ये फ्रिजमधील थंड दही खाऊ नका

फ्रिजमध्ये ठेवलेले गार दही खाल्ल्याने गळ्याला त्रास होऊ शकतो आणि सर्दी किंवा खोकल्याची लक्षणे तात्पुरती वाढू शकतात. त्यामुळे दही नेहमी रुम टेंम्परेचरवर आणूनच खावे.

दही खाणे रात्री टाळावे: आयुर्वेद आणि निसर्गोपचारानुसार, रात्रीच्या वेळी शरीराचे तापमान बदलते. त्यामुळे रात्री दही खाल्ल्याने काहींना गळ्यात जडपणा किंवा कफ जाणवू शकतो.

सर्दी झाली असल्यास दिवसा दही खा, तसेच जास्त आंबट झालेले दही खाणे टाळा. ताजे आणि गोड दही खाणे अधिक फायदेशीर ठरते.

जर तुम्हाला सर्दी असताना दही खाण्याची भीती वाटत असेल, तर दह्यामध्ये चमचाभर मध, चिमूटभर मिरी पूड किंवा भाजलेली जिरे पूड टाकून खा.