Tykky | हे फोटो तुम्हाला AI Generated किंवा परग्रहावरील वाटतील पण हा आहे निसर्गाचा चमत्‍कार!

Namdev Gharal

फिनलंडमधील विषेशता उत्तर फिनलंडमध्ये गोठणबिंदूच्या खाली तापमान -१५°C ते -४०°C जाते. यावेळी येथिल झाडांवर बर्फ पडतो त्‍यातून अशी सुंदर निसर्गशिल्पे तयार होतात.

उत्तर फिनलंडमधील लॅपलाँड (Lapland) प्रांतातील गोठलेली झाडे पाहिल्यानंतर ती किंवा 'AI जनरेटेड' असावीत असा भास होतो.

या नैसर्गिक चमत्काराला किंवा गोठलेल्या झाडांना 'ट्युकी' (Tykky) असे म्हटले जाते. बर्फाच्या वजनामुळे ही झाडे वाकतात, ज्यामुळे त्यांना वेगवेगळे अजब आकार प्राप्त होतात.

जेव्हा आर्द्र हवा वेगाने वाहत येते आणि उणे तापमानामुळे झाडांच्या संपर्कात येताच ती गोठते, तेव्हा झाडांवर बर्फाचे जाड थर साचू लागतात. याला 'Hard Rime' असे म्हणतात.

या ठिकाणी प्रामुख्याने स्प्रूस (Spruce) आणि पाईन (Pine) जातीची झाडे आढळतात.

बर्फाचा थर इतका जाड होतो की झाडाची मूळ पाने किंवा फांद्या अजिबात दिसत नाहीत. त्यामुळे ही झाडे पांढऱ्याशुभ्र 'आईस्क्रीम स्कूप' किंवा 'विचित्र आकृत्यांसारखी' दिसू लागतात.

या झाडांना लांबून पाहिल्यावर ती झाडे न वाटता एखाद्या परग्रहावरील गूढ प्राणी किंवा पांढऱ्या मूर्तींसारखी दिसतात.

हिवाळ्यात तिथे ध्रुवीय प्रकाशात (Northern Lights) ही झाडे निळी, गुलाबी किंवा जांभळी दिसतात, ज्यामुळे तो अनुभव अधिकच स्वप्नवत होतो.

एका झाडावर साचलेल्या बर्फाचे वजन कधीकधी ३,००० ते ४,००० किलो (३-४ टन) पर्यंत असू शकते! तरीही निसर्गाची किमया अशी की ही झाडे ते वजन सहन करतात.

फिनलंडमधील रिसीतुनतुरी नॅशनल पार्क (Riisitunturi National Park) हे या दृश्यांसाठी जगप्रसिद्ध आहे.

Headlight | दुचाकीचे हेडलाईट दिवस-रात्र का सुरु असतात?