पुढारी वृत्तसेवा
आजकाल फ्रोझन शोल्डरचा त्रास अनेकांना होतो. या आजारात हात पाठीमागे जात नाही तसेच वरती उचलत असतानाही वेदना होतात
यासाठी या काही गोष्टी पाळल्या पाहिजेत त्यामध्ये व्यायाम व मसाज हे प्रभावी ठरु शकते
ज्याठिकाणी वेदना होतात स्नेहन करणे म्हणजे त्याठिकाणी दररोज रात्री मालिश करणाऱ्या तेलाने मसाज करायचा आहे
दुसरी गोष्ट म्हणजे हॉट वॉटर बॅगने किंवा खडे मीठ - वाळूची पोटली तयार करुन खांदा, हात याला शेक द्यायचा आहे
सर्वात महत्वाचा म्हणजे व्यायाम, यामध्ये पहिल्यांदा आपण शाळेत पीटीच्या तासाला जे व्यायाम करायचो ते करणे
यामध्ये हात वरती घेणे, बाजूला घेणे हळू हळू हात राऊंडमध्ये फिरवणे यानेही खांद्याचे स्नायू लवचिक होतात
दसरी गोष्ट म्हणजे हातात एक लिटरची बाटली घ्यायची खाली - वर - बाजूला असे रोटेशन करणे
या काही गोष्टी तुमच्या खांद्याचा मसल्सला चांगला व्यायाम देईल व हळू हळू आराम देईल
या सर्वांबरोबर तुम्ही डॉक्टरांनी दिलेली औषधे घेतली तर बराच फरक पडेल