Namdev Gharal
डॉक्टरांचे सर्वात महत्वाचे साधन म्हणजे स्टेस्थोस्कोप हे रुग्णाच्या छातीला लावल्यावर शरिरातंर्गत आवाज डॉक्टरांना अचूक निदान करण्यास मदत करतात
पण या स्टेस्थोस्कापच्या निर्मितीची कहाणी खूपच रंजक आहे. पूर्वी डॉक्टर रुग्णाच्या छातीला कान लावून फूप्पुसातील आवाज ऐकून उपचारांची दिशा ठरवत असत
या पद्धतीला 'Direct Auscultation' म्हटले जायचे. पण ही पद्धत अनेकदा डॉक्टर आणि रुग्ण दोघांसाठीही गैरसोयीची ठरायची.
पण 1816 मध्ये फ्रान्सचे डॉक्टर रेने लॅयनॅक René Laennec यांच्याकडू एक तरुणी रुग्ण म्हणून आली. पण त्या तरुणीच्या छातीवर कान ठेवून ऐकणे डॉक्टरांना खूप अनकम्फरर्टेबल झाले
दरम्यान डॉ. रेने यांनी काही मुलांना एका पोकळ लाकडी दांड्याच्या एका टोकावर टाचणीने ओरखडे काढताना आणि दुसऱ्या टोकावर कान ठेवून तो आवाज ऐकताना पाहिले होते
यातून त्यानी तत्काळ विचार करत जवळील एक जाड कागद घेतला व त्याची नळी तयार केली व तिचे एक टोक रुग्णाच्या छातीला लावले व दुसरे कानाला. हाच जगातील पहिला स्टस्थोस्कोप
रेनेल यांच्या लक्षात आले की नळीतून आवाज हा अधिक सुस्पष्ट येतो. त्यांनी मग यात सुधारणा करुन एक लाकडाची पोकळ नळी तयार केली.
याला त्यांनी ग्रीक शब्द 'Stethos' (छाती) आणि 'Skopein' (पाहणे/तपासणे) यावरून 'स्टेथस्कोप' असे नाव दिले.
पुढे १८५१ मध्ये आर्थर लीयर्ड यांनी दोन्ही कानांनी ऐकता येईल असा स्टेथस्कोप बनवला, आणि १८५२ मध्ये जॉर्ज कॅमन यांनी त्यात सुधारणा करून तो आजच्या आधुनिक स्वरूपात आणला.