पुढारी वृत्तसेवा
‘कॉकरोच जनता पार्टी’मागचा चेहरा
इन्स्टाग्रामवर BJPलाही मागे टाकणारा अभिजीत दिपके नेमका किती शिकला आहे?
सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ एका वादग्रस्त टिप्पणीपासून सुरू झाल्याची चर्चा आहे.
कोण आहेत अभिजीत दिपके?
अभिजीत दिपके हा 30 वर्षीय डिजिटल स्ट्रॅटजिस्ट आहे. सोशल मीडिया आणि राजकीय कम्युनिकेशन क्षेत्रात त्याची चांगली ओळख आहे.
पुण्यातून घेतलं शिक्षण
अभिजीतने पुण्यातून पत्रकारितेत (Journalism) पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.
अमेरिकेत उच्च शिक्षण
ग्रॅज्युएशननंतर तो अमेरिकेत गेला आणि प्रतिष्ठित बॉस्टन विद्यापीठातून Public Relations (PR) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं.
डिजिटल नॅरेटिव एक्सपर्ट
अभिजीत हा केवळ सोशल मीडिया युजर नाही. तो पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रेटेजिस्ट म्हणून काम करतो.
नेमकं काम काय?
राजकीय पक्षांसाठी डिजिटल कॅम्पेन तयार करणं, पक्षांचे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ऑनलाइन चर्चा घडवणं हे त्यांचं काम आहे.
इन्स्टाग्रामवर मोठा धमाका!
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या इन्स्टाग्राम पेजवर काही दिवसांतच करोडो फॉलोअर्स झाले आहेत.
शिक्षणानंतरही नोकरीसाठी अर्ज
एका मुलाखतीत अभिजीतने सांगितलं की, उच्च शिक्षण असूनही तो सामान्य तरुणांप्रमाणे नोकरीसाठी अर्ज करत आहे.