पुढारी वृत्तसेवा
अंडं, चिकन की मटण?
सर्वात पटकन काय पचतं? खाण्यापूर्वी एकदा नक्की जाणून घ्या!
प्रोटीन खाता, पण पचनाचं काय?
अनेकजण जास्त प्रोटीनसाठी अंडी, चिकन किंवा मटण खातात. पण प्रत्येक प्रोटीन शरीरात वेगवेगळ्या गतीने पचतं.
अंडं – पचायला सर्वात सोपं
प्रोटीनच्या बाबतीत अंडं ‘सुपरफूड’ मानलं जातं. शरीर अंड्यातील प्रोटीन सहज आणि पटकन शोषून घेतं.
अंडं पचायला किती वेळ?
1 पूर्ण अंडं पचायला साधारण 2 ते 3 तास लागतात. वर्कआउटनंतर किंवा सकाळी खाण्यासाठी उत्तम पर्याय.
चिकन – फिटनेसवाल्यांची पहिली पसंती
चिकन ब्रेस्टमध्ये फॅट कमी असतं. म्हणून ते सहज पचतं.
चिकन पचायला किती वेळ?
उकडलेलं किंवा ग्रिल्ड चिकन पचायला 2.5 ते 3.5 तास लागू शकतात. कमकुवत पचन असलेल्यांसाठीही तुलनेने हलकं.
मटण – चवदार, पण पोटासाठी जड
मटणात प्रोटीन भरपूर असलं तरी फॅट जास्त असतं. त्यामुळे पोटाला ते पचवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते.
मटण पचायला किती वेळ?
मटण किंवा रेड मीट पचायला 4 ते 6 तास किंवा अधिक वेळ लागू शकतो. रात्री उशिरा मटण खाणं टाळण्याचा सल्ला दिला जातो.
मग सर्वात बेस्ट काय?
पटकन पचायचं असेल → अंडं, हाय प्रोटीन + हलकं → चिकन, चव पण पचायला जड → मटण
फक्त प्रोटीन नाही, पचनही महत्त्वाचं!
तुमच्या शरीराला काय सूट होतं हे समजूनच डाएट ठरवा. जास्त प्रोटीनपेक्षा योग्य प्रोटीन निवडणं जास्त गरजेचं