२०,००० ते ३०,००० रुपये किलो! काय खासियत आहे गुच्ची मशरुमची

Namdev Gharal

गुच्ची मशरूम हा एक अतिशय दुर्मिळ व महागडा खाद्य मशरुमचा प्रकार आहे. हे मुख्यतः हिमालयीन भागात, जम्मू-काश्मीर आदीच्या डोंगराळ जंगलांमध्ये आढळते

याच्या वाढीसाठी विशिष्ट हवामान व मातीची गरज असते, म्हणूनच हे अत्यंत दुर्मिळ आहे.

याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हाडे व स्नायूंना बळकट करते.

याचा रंग हलका तपकिरी ते गडद तपकिरी.मधमाशीच्या पोळ्यासारखी जाळीसदृश रचना असलेला डोक्याचा भाग असतो

याची चव सुगंधी, मऊ आणि किंचित बदामासारखी असते व याची वाढ नैसर्गिकरीत्या होते

वसंत ऋतूमध्ये बर्फ वितळल्यानंतर जंगलातील ओलसर जमिनीत हे उगवते.

प्रथिने, फायबर, लोह, व्हिटॅमिन डी आणि अँटिऑक्सिडंट्स यांचा उत्तम स्रोत म्‍हणून हे मशरुम ओळखले जाते

पुलाव, बिर्याणी, सूप, करी आणि महागड्या अशा विशेष राजेशाही पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो

भारतात याची किंमत 20,000 ते 30,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते.