पुढारी वृत्तसेवा
अनेकांना सलग अनेक रात्री पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक जाग येत असल्याचा अनुभव येतो. असे वारंवार घडू लागले की अनेकजण चिंतेत पडतात
रात्री झोपेतून काही क्षणांसाठी जाग येणे ही पूर्णपणे सामान्य बाब आहे. खरं तर बहुतांश लोकांना रात्री अनेक वेळा थोडी जाग येते
रात्री वारंवार जाग येण्यामागील एक संभाव्य कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. कॉर्टिसोल या संप्रेरकाला शरीरातील 'ताणतणावाचे संप्रेरक' असेही म्हटले जाते
पहाटेच्या सुमारास कॉर्टिसोलची पातळी नैसर्गिकरीत्या वाढू लागते. शरीराला जागे होण्यासाठी तयार करण्याचे काम हे संप्रेरक करते
झोपेमध्ये व्यत्यय येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. चिंता आणि नैराश्य यांसारख्या मानसिक समस्या हे त्यापैकी महत्त्वाचे घटक आहेत
स्लीप अॅप्निया , दीर्घकालीन वेदना, अॅसिड रिफ्लक्स (आम्लपित्त) आणि हार्मोन्समधील बदल यांसारख्या वैद्यकीय समस्यांमुळेही झोपमोड होऊ शकते
दिवसभरात उशिरा कॉफी किंवा चहासारख्या कॅफिनयुक्त पेयांचे सेवन करणे, झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा इतर स्क्रीनचा अधिक वापर करणे
संध्याकाळी मद्यपान करणे आणि झोपण्याच्या वेळेत सातत्य नसणे, अशा दैनंदिन सवयींमुळेही मध्यरात्री जाग येण्याची शक्यता वाढते
बहुतेक वेळा पहाटे ३ वाजता जाग येणे म्हणजे शरीर तुम्हाला एखादा गूढ संदेश देत नसते. उलट, शांत आणि पुरेशी झोप मिळण्यात काहीतरी अडथळा निर्माण होत असल्याचा तो संकेत असू शकतो