Mood booster foods : मूड ऑफ झालाय? 'हे' पदार्थ मिनिटांत दूर करतील तुमची चिडचिड!

पुढारी वृत्तसेवा

सॅल्मन आणि मॅकरेलसारख्या माशांचे सेवन मनावरचे नैराश्य दूर करण्‍यास मदत करतात.

डार्क चॉकलेटमध्ये असणारे विशेष गुणधर्म मन ताजेतवाने करून चेहऱ्यावर आनंद फुलवतात.

बदाम, काजू, भोपळा आणि सूर्यफुलाच्या बिया शरीरात 'सेरोटोनिन' (आनंद देणारे रसायन) तयार करतात, ज्यामुळे मन प्रसन्न राहते.

ओट्समधून शरीराला आवश्यक प्रथिने मिळतातच, शिवाय नैराश्याची लक्षणे कमी करण्यासाठीही ते फायदेशीर ठरतात.

दही खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. पोटाचे आरोग्य उत्तम राहिले की मानसिक आरोग्यही सुधारते.

केळीमध्ये भरपूर प्रमाणात 'व्हिटॅमिन बी६' असते, ज्यामुळे मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिन हे 'हॅपी हार्मोन्स' तयार होतात.

बेरीचे सेवन केल्याने शरीरातील दाह (सूज) कमी होतो आणि नैराश्याचा धोका टळण्यास मदत मिळते.

कॉफी केवळ आळस घालवत नाही, तर मेंदूला आनंदी ठेवणारे घटकही सक्रिय करण्याचे काम करते.

येथे क्‍लिक करा.