दहीसोबत 'हे' ५ पदार्थ चुकूनही खाऊ नका

पुढारी वृत्तसेवा

दही खाताना ही चूक करत असाल तर पोट नक्कीच बंड करेल

दह्यामध्ये आंबट फळे (जसे की संत्री, लिंबू) मिसळून खाल्ल्याने शरीरात पित्त वाढते आणि पचन बिघडते.

मासे गरम प्रवृत्तीचे असतात तर दही थंड; हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने त्वचेचे विकार किंवा ॲलर्जी होऊ शकते.

अनेकजण दह्यात कांदा, कोशिंबीर घालून खातात, पण यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊन पुरळ किंवा खाज येण्याची शक्यता असते.

दही आणि दूध कधीही एकत्र घेऊ नका, कारण यामुळे पोट फुगणे, गॅस आणि ॲसिडिटीच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

पराठा किंवा भजी दह्यासोबत खाणे चविष्ट वाटत असले तरी, यामुळे पचनक्रिया मंदावते आणि आळस येतो.

दह्यासोबत उडीद डाळीचे पदार्थ (उदा. दही वडा) जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तदाब वाढण्याची भीती असते.

रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे, कारण यामुळे कफ आणि श्वसनाचे त्रास होऊ शकतात.

येथे क्लिक करा...