स्वालिया न. शिकलगार
शरीरात यूरिक ॲसिड वाढले की सांधेदुखी, गाउट, मुतखडा होतो
ते कमी करण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत हे बदल महत्त्वाचे आहेत
खाण्या-पिण्यात प्युरिन जास्त असलेले पदार्थ कमी करा, प्युरिनपासूनच यूरिक ॲसिड तयार होते
रेड मीट, मटण, कलेजी, मॅकरेल मासे, कोळंबी, खेकडे टाळा
डाळींपैकी: मसूर, हरभरा, राजमा, छोले जास्त खाऊ नका. पालक, फ्लॉवर, मशरूम पण मर्यादित ठेवा
कोल्ड्रिंक, पॅकबंद ज्यूस, मिठाई यातली फ्रुक्टोज साखर यूरिक ॲसिड वाढवते
बिअर-दारू युरिक ॲसिड खूप वाढवते आणि ते लघवीतून बाहेर पडू देत नाही
बेकरी पदार्थ, फास्ट फूड, जास्त तेलकट असे तळलेले, मैद्याचे पदार्थ टाळा