पुढारी वृत्तसेवा
सॅल्मन आणि मॅकरेल यांसारखे मासे खाल्ल्याने नैराश्य कमी होण्यास मदत होते.
डार्क चॉकलेटमध्ये अशी काही खास तत्वे असतात ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने आणि आनंदी वाटते.
बदाम, काजू, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया शरीरात 'सेरोटोनिन' (आनंद देणारे रसायन) तयार करतात, ज्यामुळे मूड चांगला राहतो.
ओट्समधून प्रथिने मिळतातच, पण ते उदासीनता किंवा नैराश्याची लक्षणे कमी करण्यासही गुणकारी आहेत.
दही खाल्ल्याने आपले पोट (आतडे) साफ राहते. पोटाचे आरोग्य चांगले असेल तर मानसिक आरोग्यही सुधारते.
केळीमध्ये 'व्हिटॅमिन बी६' भरपूर असते. यामुळे मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिन ही 'हॅपी हार्मोन्स' तयार होतात.
बेरी खाल्ल्याने शरीरातील सूज किंवा दाह कमी होतो, ज्यामुळे नैराश्याचा धोका कमी होतो.
कॉफीमुळे फक्त सुस्तीच जात नाही, तर ती मेंदूला आनंदी ठेवणारे घटक सक्रिय करते.
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.