Kali Bahuli | काळी बाहूली खरचं नजर लागू देत नाही: तथ्य किती, विज्ञान किती?

Namdev Gharal

आपल्याकडे कोणतीही नवीन वस्तू घेतली किंवा नवीन घर बांधले तर दरवाजावर किंवा सहज नजर जाईल येथे एक विद्रूप काळी बाहूली बांधली जाते

मुळात काळी बाहूली ही एक मनोवैज्ञानिक संकल्पना आहे. आपल्या कष्टाने घेतलेल्या वस्तूंवर कोणाच्यास वाईट नजरेचा परिणाम होतो अशी धारणा आहे

विज्ञानाच्या दृष्टीने काळी बाहुली बांधल्याने संकटे टळतात किंवा नजर लागत नाही, याला कोणताही पुरावा नाही. हा पूर्णपणे मानोवैज्ञानिक (Psychological) विषय आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे या परंपरेमागे एक तर्क असा दिला जातो की, जेव्हा कोणी वाईट हेतूने किंवा मत्सराने तुमच्या वस्तूंकडे पाहते, तेव्हा त्या भयानक बाहुलीकडे पाहिल्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते.

या विद्रूप बाहूलीकडे नजर गेल्यामुळे तुमच्या आवडत्‍या वस्तूवर पडणारी 'एकाग्र नकारात्मक ऊर्जा' विभागली जाते, असे मानले जाते.

या परंपरेची मुळे प्राचीन काळातील 'टोटेम' (Totemism) काळात (मानव पहिल्यांदा टोळी तयार करुन राहू लागला त्‍यावेळी), अशी पंरपरा सुरु झाली असे मानले जाते

प्राचीन काळात शिकारी किंवा टोळ्या स्वतःच्या संरक्षणासाठी घराबाहेर प्राण्यांची कवटी किंवा हाडे टांगत असत, जेणेकरून शत्रू किंवा हिंस्र श्वापदे घाबरतील.

भारतातील ग्रामीण भागात 'दृष्ट' काढण्याची प्रथा जुनी आहे. पूर्वी शेतात पिकांचे रक्षण करण्यासाठी 'बुजगावणे' उभे केले जात असे. हळूहळू त्याचे स्वरूप बदलून ते घराच्या आणि गाडीच्या बाहुलीत रूपांतरित झाले.

वाईट शक्तींना घाबरवण्यासाठी 'भयानक' दिसणाऱ्या गोष्टींचा वापर करण्याची पद्धत जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये (उदा. मेसोपोटेमिया, ग्रीस) वेगवेगळ्या रूपात दिसून येते.

यातुनच आपल्याकडे काळी बाहूली बांधण्याची प्रथा सुरु झाली तसेच काळा रंग नकारात्मकता शोषून घेतो, अशी एक लोकधारणा आहे.

अनेकांसाठी ही बाहुली एक 'सुरक्षा कवच' म्हणून काम करते, ज्यामुळे त्यांना मानसिक समाधान मिळते.

Titwi bird | टिटवीचे ओरडणे अशुभ का मानले जाते? काय आहे सत्‍य!