Brain-boosting foods| मेंदूची कार्यक्षमता वाढविणारे 'हे' पदार्थ तुम्हाला माहित आहेत का?

दिनेश चोरगे

डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉईडस्, कॅफिन आणि अँटीऑक्सिडंटस् असतात, ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते व मेंदूचे कार्य सुधारते.

हळद : हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे संयुग असते, जे स्मरणशक्ती सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे.

कॉफी : कॉफीमधील कॅफीन (caffeine) हा घटक मेंदूमधील 'अ‍ॅडेनोसिन' (adenosine) या रसायनाला थांबवतो, ज्यामुळे मेंदू अधिक सतर्क आणि कार्यक्षम बनतो.

सुका मेवा : सुका मेवा खाल्ल्याने मेंदूचे कार्य चांगल्याप्रकारे सुधारते. सुक्या मेव्याला 'ब्रेन फूड' असेही म्हणतात.

भोपळ्याच्या बिया : भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक महत्त्वाचे पोषक असतात. त्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते.

मासे : मासे खाल्ल्यामुळे मेंदूचे कार्य चांगल्याप्रकारे सुधारते.चरबीयुक्त मासे हे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.

ग्रीन टी : ग्रीन टी मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

डाळिंब : डाळिंबमध्ये अनेक शक्तीशाली पोषक घटक असतात. जे मेंदुचे कार्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते.

बीट : बीटमधील 'नायट्रिक ऑक्साईड' रक्तवाहिन्यांना आराम देतो आणि त्यांना रुंद करतो, यामुळे मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह सुधारतो

येथे क्लिक करा