Morning Water Drinking : सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे खरंच फायदेशीर आहे का? रिसर्च काय सांगतो?

पुढारी वृत्तसेवा

सकाळी पाणी पिण्याने सर्व आजार बरे होतात, असा अनेकांचा गैरसमज आहे.

अमेरिकेतील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ'नुसार, रात्रभर शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याचे काम 'व्हॅसोप्रेसिन' संप्रेरके करतात.

निरोगी व्यक्तीने सकाळी उठल्यावर पाणी पाण्याची घाई करण्याची अजिबात गरज नसते.

सकाळी पाणी पिण्यामागे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, हा दावा सर्वात जास्त केला जातो.

मात्र, 'डिटॉक्स' होण्याची क्रिया आपले यकृत (Liver) आणि किडनी ही प्रक्रिया २४ तास करत असतात.

'सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन'नुसार, तुम्ही पाणी कधी पिता यापेक्षा तुमच्‍या शरीराला त्‍याची केव्‍हा गरज आहे हे महत्त्‍वाचे.

सकाळी उपाशी पोटी जास्त पाणी प्यायल्याने जठरातील पाचक आम्ल सौम्य होऊन पोट फुगल्यासारखे वाटू शकते.

एकाच वेळी पिण्याऐवजी दिवसभर थोडे थोडे पाणी पिणे अधिक योग्य ठरते.

सकाळी हलका व्यायाम करणे, पौष्टिक नाश्ता घेणे आणि दिवसभरात गरजेनुसार योग्य प्रमाणात पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.

शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पाणी कधीही एकाच वेळी गटागटा न पिता नेहमी हळूहळू घोट घोट करून प्यावे.

Drinking Water | Pudhari
येथे क्‍लिक करा.