Anirudha Sankpal
भारतात सध्या सूर्यदेव चांगलेच लाल झाले आहेत. अनेक शहरात रेकॉर्ड ब्रेक तापमान पोहचलं आहे.
उन्हाचा तडाखा वाढला की खाण्याच्या पदार्थ लगेच खराब होऊ लागतात. चला तर मग जाणून घेऊयात टिफीनमधून नेलेले कोणते पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता आहे.
१ नारळाची चटणी
नारळाच्या चटणीमध्ये ओलावा जास्त असल्याने ती उन्हाळ्यात अवघ्या काही तासांत आंबट होते आणि तिला दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे प्रवासात किंवा ऑफिसला ही चटणी नेणे टाळावे.
२ दही-भात
दही-भात उन्हाळ्यात थंडावा देत असला तरी, गरम वातावरणामुळे दही लवकर आंबते (Ferment). यामुळे भात चिकट आणि चवीला खूपच आंबट होतो, जो खाल्ल्याने पोटाचे विकार होऊ शकतात.
3 ओल्या नारळाचे पदार्थ
कोकोनट राईस किंवा उपमा यांसारख्या ज्या पदार्थांमध्ये ओला नारळ वापरला जातो, ते पदार्थ उन्हाळ्यात लवकर खराब होतात. उष्णतेमुळे नारळाची चव लगेच बदलते.
4 पुरी-भाजी
डब्यासाठी पुरी-भाजी हा आवडीचा पर्याय असला तरी उन्हाळ्यात पुरी वाफेमुळे चिकट होते. तसेच बटाट्याच्या भाजीतील ओलावा आणि कांद्यामुळे भाजी लवकर खराब होऊ शकते.
5 अंड्याचे पदार्थ
एग रोल, सँडविच किंवा अंड्याची भुर्जी उन्हाळ्यात काही तासांतच खराब होते. अंड्याला लवकर दुर्गंधी येते, ज्यामुळे ते पदार्थ खाण्यायोग्य राहत नाहीत.
6 पनीरच्या डिशेस
पनीरचे पदार्थ, विशेषतः ग्रेवी किंवा क्रीम असलेले पदार्थ उन्हाळ्यात लवकर खराब होतात. उष्णतेमुळे पनीरचा पोत आणि चव दोन्ही बिघडते.