वृद्धत्व दूर ठेवायचंय? मग पिंपळाच्या झाडाचा 'हा' आयुर्वेदिक उपाय नक्की करून पाहा

पुढारी वृत्तसेवा

१) शक्तिवर्धक व वृद्धत्व दूर ठेवण्यासाठी पिंपळाच्या झाडाची साल, फळ, कोंब व मूळ प्रत्येकी ५ ग्रॅम घेऊन १ ग्लास दूध व १ ग्लास पाण्यात टाकून मंदाग्नीवर आटवावे.

फक्त १ ग्लास उरल्यावर त्यांत खडीसाखर घालून प्यावे. असे किमान सहा महिने करावे.

२) सुजेवर : झाडाच्या सालीचा वाटून लेप करावा.

३) मुडदूस : मुलांस लाक्षादि तेलाने सावकाश मालिश करून कोवळ्या उन्हात (सकाळच्या वेळी) बसवावे. याने हाडे मजबूत होऊन मुले सशक्त होतात.

४) वंध्यत्व : कोवळ्या अंकुरांचा/कोंबांचा कल्क करून गाईच्या दुधातून रोज सकाळी एकदा बलाबल पाहून एकवीस दिवस घ्यावा.

५) दम्याच्या विकारात : सुकलेल्या फळांचे चूर्ण गाईच्या दुधाबरोबर घ्यावे.

६) दातवण : दात घासण्यासाठी याच्या कोवळ्या फांद्यांचा उपयोग करावा.

७) दात पांढरे शुभ्र होण्यासाठी : पिंपळाच्या लाखेपासून तयार केलेले 'लाक्षादी तेल' बाजारात तयार मिळते. पिवळे, काळसर पुटे चढलेले दात या तेलाने घासले असता पांढरे शुभ्र होतात.

हे उपाय 'नैसर्गिक औषधे आणि घरगुती उपाय' (वि.अ.रणदिवे) या पुस्तकातील आहेत. कोणताही उपाय करण्याआधी तज्ञांचा सल्ला आवश्यक.