पुढारी वृत्तसेवा
भाजलेल्या अळशीच्या (जवस) बिया, तिळाच्या बिया, शेंगदाणे, लसणाच्या पाकळ्या, लाल मिरच्या, मीठ, जिरे यापासून अळशीची चटणी बनवली जाते
अळशीच्या चटणीत प्रोटीन, लिगनेल फॅटी अॅसिड्स, अल्फा लिनोलेनिक अॅसिड, ओमेगा-३ मुबलक प्रमाणात असते
रोजच्या आहारासोबत या चटणीचे सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते
अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, पोटॅशियम असल्याने हृदयाच्या धमन्या निरोगी राहतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
अळशीच्या बियांतील बायोअॅक्टिव्ह गुणांमुळे अँटी ऑक्सिडेंट्स, अँटी इफ्लेमेटरी आणि अँटी कॅन्सर गुण असतात,
अळशीची चटणी हृदय, लिव्हर, सुंदर त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी हेल्दी मानली जाते
ही चटणी फक्त चवीलाच नाही तर हेल्दी फॅट्स, अँटी ऑक्सिडेंट्स, फायबर्सचा एक चांगला स्त्रोत आहे
हिवाळ्यात बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. अळशीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचनक्रिया सुधारून पोट साफ राहते
अळशी भाजून थोड्या प्रमाणात खा, दूध किंवा कोमट पाण्यात मिसळून खाता येते, कोशिंबीर किंवा दह्यासोबत खावू शकता