स्वालिया न. शिकलगार
साहित्य - १ कप अळशीच्या बिया, १० लसूण पाकळ्या, ४ सुक्या लाल मिरच्या, जिरे, शेंगदाण्याचा कूट, मीठ
कृती- अळशीच्या बिया मंद आचेवर भाजून घ्या. बिया तडतडू लागल्या की गॅस बंद करा
त्याच कढईत जिरे आणि सुक्या लाल मिरच्या हलक्या भाजून घ्या
भाजलेले सर्व साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्या
मिक्सरमध्ये अळशीच्या बिया, जिरे, मिरची, लसूण, कूट, मीठ मिश्रण जाडसर वाटून घ्या
कोरडे व हवाबंद डब्यात ही चटणी भरून झाकण घट्ट लावा
अधिक खमंग चव हवी असल्यास थोडे कोरडे खोबरे भाजून घालू शकता
तिखटपणा वाढवण्यासाठी लाल मिरच्यांचे प्रमाण वाढवा. ही चटणी ८-१० दिवस टिकते