5 Minute Exercises: दररोज फक्त ५ मिनिटेच व्यायाम पुरेसा ठरतो... रिसर्च काय सांगतो?

Anirudha Sankpal

सलग बसण्याच्या जीवनशैलीत फायदेशीर

या पाच मिनिटांच्या कसरतीचा फायदा आधीपासूनच अत्यंत तंदुरुस्त किंवा सक्रिय (Active) असणाऱ्या लोकांपेक्षा, सलग बसण्याची जीवनशैली असलेल्यांवर अधिक दिसून येतो.

मोठ्या डेटावर आधारित निष्कर्ष

या निष्कर्षासाठी ब्रिटन, अमेरिका आणि स्कॅन्डिनेव्हियामधील सुमारे १,५०,००० प्रौढ नागरिकांच्या आरोग्य डेटाचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे.

Best time for Exercise | (Canva Photo)

तीव्र वर्कआउटची गरज नाही

तज्ज्ञांच्या मते, निरोगी शरीरासाठी जिममध्ये जाऊन तासनतास अति-तीव्र (Intense) वर्कआउट करणेच गरजेचे नाही, तर दैनंदिन जीवनात हालचाली वाढवणेही पुरेसे ठरते.

Exercises During Pregnancy | Canva

अवेळी मृत्यूचा धोका टळतो

'द लॅन्सेट' मासिकात प्रकाशित झालेल्या एका मेटा संशोधनानुसार, दररोज केवळ पाच मिनिटे जरी कसरत केली, तरी अंदाजे १० पैकी १ अवेळी मृत्यू रोखला जाऊ शकतो.

तुम्ही घरात करू शकता 'हे' ७ व्यायाम | (Pexel Photo)

सोपे पर्याय प्रभावी

रोज फक्त पाच मिनिटांसाठी वेगाने चालणे (Brisk Walk), सायकल चालवणे किंवा पायऱ्या चढणे-उतरणे यांसारख्या छोट्या गोष्टींमुळेही शरीराला मोठा फायदा होतो.

Walking Tips | (Pinterest Photo)

बसणे ३० मिनिटांनी कमी करा

अभ्यासानुसार, जर तुम्ही तुमचा रोजचा सलग बसण्याचा वेळ केवळ ३० मिनिटांनी कमी केला, तर अवेळी मृत्यूचा धोका ७ टक्क्यांनी कमी होतो.

Office Abs Exercises | Pinterest Image

लहन गोष्टींना सवय बनवा

निरोगी राहण्यासाठी लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करणे किंवा घरातील कामे करताना हलके स्ट्रेचिंग करणे यांसारख्या आरोग्यदायी सवयी अंगीकाराव्यात.

तणाव आणि थकवा होतो कमी

बेसिक व्यायामामुळे शरीरातील अतिरिक्त मानसिक ताण आणि शारीरिक थकवा कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे आयुष्याची गुणवत्ता सुधारते.

Migraine Relief Exercise

वृद्धापकाळ सुखाचा होतो

रोड आयलंड विद्यापीठाच्या प्राध्यापिका निकोल लोगन यांच्या मते, शरीराची कार्यक्षमता, स्नायूंची ताकद आणि हाडांची मजबुती या गोष्टी तुमचा वृद्धापकाळ कसा असेल हे ठरवतात.

येथे क्लिक करा