Acidity Symptoms: अतिप्रमाणात घाम, केस गळती... पित्त वाढल्याचे संकेत अन् उपाय

Anirudha Sankpal

पित्त वाढल्याचे सुरुवातीचे संकेत

छातीत जळजळ, आंबट ढेकर, त्वचेवर लाल पुरळ किंवा चकत्ते पडणे आणि तोंडात कडू किंवा आंबट चव येणे हे पित्त वाढल्याचे मुख्य संकेत आहेत.

गंभीर लक्षणे

अतिप्रमाणात घाम येणे, सतत राग व चिडचिड होणे, केस अकाली पांढरे होणे किंवा गळणे आणि डोळे व लघवी पिवळी होणे यावरून पित्त नक्कीच बिघडल्याचे समजते.

पहिला उपाय

पित्त शांत करण्यासाठी मधुर, कडू आणि तुरट रसाचा आहारात समावेश करा; जसे की दुधी भोपळा, काकडी, ओले नारळ पाणी, गुलकंद, दूध आणि तूप.

काय खाणे टाळावे?

अति तिखट, आंबट, खारट आणि तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळावेत, तसेच रात्रीच्या वेळी दही खाणे आवर्जून बंद करावे.

दुसरा उपाय

शरीराची उष्णता कमी करण्यासाठी रोज आंघोळीपूर्वी डोके, तळपाय आणि नाभीवर खोबरेल तेल किंवा चंदनयुक्त तेलाने हलक्या हाताने मालिश (अभ्यंग) करावी.

तिसरा उपाय

जीभ नळीसारखी गोल करून मुखावाटे दीर्घ श्वास आत घ्यावा आणि काही क्षण रोखून तो नाकाद्वारे हळूहळू सोडावा; हा प्राणायाम रोज सकाळी व संध्याकाळी १० वेळा करावा.

चौथा उपाय

पित्त वाढल्यास उन्हात जाणे टाळावे आणि मानसिक ताण व क्रोधावर नियंत्रण ठेवून मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा.

पाचवा उपाय

त्रिदोष आणि विशेषतः पित्तशामक असलेल्या 'आवळा अवलेह'चे रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करून वरून कोमट पाणी प्यावे.

येथे क्लिक करा