Blood Diet Animals | रक्त पिऊन जगणारे 'हे' ५ प्राणी माहित आहेत का?

अविनाश सुतार

रक्त शोषणारे प्राणी म्हटले की आपल्याला डास किंवा गोचीड आठवतात

काही प्राणी केवळ रक्तावर जगतात, त्यांच्या शरीरात रक्त पिण्यासाठी विशेष रचना असते

रक्त पिणाऱ्या प्राण्यांमध्ये धारदार दात, उष्णता ओळखणारे संवेदक किंवा शोषक अशी रचना असते

रक्तामध्ये प्रथिने आणि लोहासारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. आणि काही प्राण्यांसाठी तेवढेच पुरेसे असते

व्हॅम्पायर वटवाघुळे

व्हॅम्पायर वटवाघुळे रात्री सक्रिय असतात. ते पक्षी किंवा प्राण्यांच्या त्वचेवर छोटासा चीर देतात आणि रक्त शोषतात. त्यांच्या लाळेत रक्त गोठू म्हणून रसायन असते

समुद्री लॅम्प्रे (Sea Lampreys)

हे जबड्याविना असलेले मासे असून त्यांच्या गोल तोंडात असंख्य लहान दात असतात. ते इतर माशांना चिकटून रक्त व शरीरातील द्रव शोषतात

व्हॅम्पायर ग्राउंड फिंच (Vampire Ground Finch)

हा छोटा पक्षी गॅलापागोस बेटांमध्ये आढळतो. उन्हाळ्यात जेव्हा अन्न कमी होते, तेव्हा तो समुद्री पक्ष्यांना टोचून त्यांचे रक्त शोषतो

जळवा (Leeches)

गोड्या पाण्यात आढळणाऱ्या जळवा सूक्ष्म दातांच्या साहाय्याने त्वचेला भोक पाडून रक्त शोषतात, रसायन सोडतात ज्यामुळे रक्त सतत वाहत राहते. वैद्यकशास्त्रात शस्त्रक्रियेनंतर रक्ताभिसरण सुधारण्यासाठी त्यांचा वापर केला जातो

कँडिरू मासा (Candiru Fish)

हा छोटासा मांजरीसारखा मासा अमेझॉनमध्ये आढळतो. तो मोठ्या माशांच्या गिल्समध्ये शिरून त्यांच्या रक्तवाहिन्यांमधून रक्त शोषतो

येथे क्लिक करा