'गट हेल्थ' म्‍हणजे काय? जाणून घ्‍या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा?

पुढारी वृत्तसेवा

आतड्यांतील जिवाणूंचे संतुलन म्हणजे 'गट हेल्थ'. विशेषतः लहान व मोठ्या आतड्यांनी चांगले कार्य करणे.

Canva

मागील १०-१५ वर्षांमध्ये गट मायक्रोबायोमवर (आतड्यांतील जिवाणू) बरीच संशोधनं झाली आहेत. यावरुन 'गट' हा 'दुसरा मेंदू' मानला जातो.

Canva

गट फक्त पचनासाठी नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती, मेंदूचे आरोग्य, लठ्ठपणा, मधुमेह, मानसिक आरोग्यामध्येही महत्त्वाची भूमिका बजावतो.

Canva

गट हेल्थचा परिणाम संपूर्ण शरीर, मानसिक स्थिती आणि दीर्घकालीन आरोग्यावर होतो, असेही संशाेधनात स्‍पष्‍ट झाले आहे.

Canva

ताक, दही हे नैसर्गिक प्रोबायोटिक्स तुमच्या आतड्यांचे सच्चे मित्रच. याचा आहारात समावेश करा

Canva

भाकरीत मोठ्या प्रमाणावर फायबर असते. पचनसंस्थेला चालना मिळते आणि आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवते.

ब्राऊन राईसमध्ये जीवनसत्त्वे, काही खनिजे, लिग्नान, फायटो केमिकल्स आणि ॲन्टीऑक्सिडंटस्मुळे भरपूर पोषक घटक असतात.

Canva

तुमच्‍या आहारात हिरव्‍या पालेभाज्‍यांचा समावेश अधिक हवा. हे आतड्यांतील चांगल्या जिवाणूंसाठी पोषण!"

Canva

रोजच्‍या जेवणात सॅलड आणि सूपचा समावेश करा. यामुळे पचनशक्‍ती मजबूत होते.

Canva

ओट्समध्ये बीटा ग्लुकन नावाचा एक विशेष फायबर असतो. तो आतड्यातील बॅक्टेरियांना पोषण देतो.

Canva
येथे क्‍लिक करा..