Fennel Seeds | केवळ मुखशुद्धीसाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही बडीशेप खाणे ठरते गुणकारी

अविनाश सुतार

बडीशेप हा पदार्थ आपल्याकडे मुखशुद्धीसाठी वापरला जातो. जेवणानंतर बडीशेप खाण्यास सर्वजण पसंती देतात

बडीशेपमध्ये कॅल्शिअम, सोडिअम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशिअमसारखे शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक असतात

पोटाच्या तक्रारीवर बडीशेप सेवन करणे फायदेशीर ठरते. बडीशेपमुळे अ‍ॅसिडिटी आणि अपचनाचा त्रास दूर होतो

बडीशेपचा गुणधर्म हा थंड आहे. उन्हाळ्यात उष्णतेच्या त्रासावर गुणकारी ठरते

बडीशेपमध्ये पोटॅशियम भरपूर असल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते, दमा, अस्थमा या आजारावर फायदेशीर ठरते

बडीशेपमध्ये फायटोन्यूट्रिएंटस् घटक असतो. त्यामुळे सायनसच्या त्रासावर बडीशेपचे सेवन करणे रामबाण उपाय आहे

बडीशेपच्या सेवनामुळे रक्तातील ऑक्सिजन वाढण्यास मदत होते. तसेच हार्मोन्स संतुलन राखण्यासाठी बडीशेप गुणकारी असते

बडीशेप खाण्याने व्हिटॅमिन 'ए'ची कमतरता भरूर निघते. त्यामुळे डोळ्यांसाठी आरोग्यासाठी बडीशेप नक्की फायदेशीर ठरते

येथे क्लिक करा