पुढारी वृत्तसेवा
जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय
भारतीय घरांमध्ये जेवणानंतर बडीशेप किंवा बडीशेप-मिश्री खाणे ही पचनासाठी चांगली सवय मानली जाते.
बडीशेप खरंच फायदेशीर असते का?
शुद्ध बडीशेप पचन सुधारते, तोंडातील दुर्गंधी कमी करते आणि गॅस-अॅसिडिटीपासून आराम देते.
भेसळयुक्त बडीशेपचा धोका
आज बाजारात मिळणाऱ्या अनेक बडीशेपांमध्ये रंग, केमिकल्स व कृत्रिम सुगंध मिसळलेले असतात.
कृत्रिम रंगांचा वापर
चमकदार हिरवी दिसणारी बडीशेप नैसर्गिक नसून त्यावर टॉक्सिक फूड कलर वापरलेला असण्याची शक्यता असते.
शरीरावर होणारे दुष्परिणाम
अशी भेसळयुक्त बडीशेप खाल्ल्याने पोटदुखी, उलटी, अॅलर्जी, लिव्हरवर ताण आणि दीर्घकाळात गंभीर आजार होऊ शकतात.
मुलांसाठी अधिक धोकादायक
लहान मुलांची पचनसंस्था नाजूक असल्याने केमिकलयुक्त बडीशेप त्यांच्यासाठी अधिक हानिकारक ठरू शकते.
बडीशेप शुद्ध आहे की नाही कसं ओळखाल?
बडीशेप पाण्यात टाकल्यावर रंग सुटत असेल किंवा ती फारच चमकदार दिसत असेल तर ती भेसळयुक्त असू शकते.
सुरक्षित बडीशेप कशी निवडावी?
फिकट हिरवी, नैसर्गिक सुगंध असलेली आणि सेंद्रिय (organic) बडीशेप निवडणे अधिक सुरक्षित ठरते.
आरोग्यासाठी काय करावे?
घरच्या घरी भाजलेली बडीशेप वापरा किंवा विश्वासार्ह ब्रँडचीच बडीशेप खरेदी करा.