Namdev Gharal
ही मेंढ्याची प्रजाती म्हणजे वाळवांटातील पहाडी योध्दाच आहे
हा खडे डोंगर अगदी सफाईदारपण चढतो. अगदी गुरुत्वाकर्षणाच्या नियमांना झुगारुन
अमेरिकेतील ॲरिझोना, कॅलिफोर्निया, नेवाडा या कोरड्या भागात तसेच मेक्सिको देशातील वाळवंटी प्रदेशात या मेंढ्या आढळतात
याचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे यातील नरांना असणारी व्रकाकार महाकाय शिंगे, या शिंगाचे वजन जवळपास १५ किलोपर्यंत असते
ही शिंगे त्यांच्या शरीरातील इतर हाडांच्या वजनाइतकीच जड असतात. वयानुसार या शिंगांवर वाढीच्या खुणा दिसतात, ज्यावरून त्यांचे वय ओळखता येते.
नर एकमेंकांबरोबर या शिंगांनी टक्कर खेळून आपली ताकद दाखवत असतात.
यांचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक आठवडे हे पाणी न पिताही राहू शकतात. झाडांच्या पानांमधून हे आपली पाण्याची गरज पूर्ण करतात.
दूरवर पाहण्यासाठी यांची नजर योग्य असते. तसेच हे मोठी झेप घेऊ शकतात, त्यामुळे वाळवंटातही यांच जगणे सुसह्य होते.
यांचा रंग चॉकलेट-ब्राऊन किंवा फिकट तपकिरी असतो. त्यांचे पोट, तोंडाच्या भागावर पांढरे केस असतात.
त्यांची खूर त्यांना खडकाळ वाटेवर पकड मिळवण्यासाठी मदत करतात, ज्यामुळे ते शिकारीपासून सहजपणे स्वतःचे रक्षण करू शकतात