Father’s Day 2025 | 'फादर्स डे' ची मूळ संकल्पना कोणाची? कोणी, कुठून सुरूवात केली 'या' दिवसाची? जाणून घ्या...
अविनाश सुतार
वडिलांचे प्रेम, पाठिंबा आणि त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरात 'फादर्स डे' १५ जून रोजी साजरा केला जातो.
हा दिवस साजरा करण्यामागे एका महिलेचा तिच्या वडिलांच्या सन्मानार्थ सुरू करण्याचा दृढनिश्चय होता.
फादर्स डे स्थापन करण्याचे श्रेय वॉशिंग्टनमधील स्पोकेन येथील एका महिलेला जाते. सोनोरा लुईस स्मार्ट डोड असे या महिलेचे नाव आहे.
वडील विल्यम जॅक्सन स्मार्ट यांच्यापासून प्रेरित होऊन तिने या संकल्पनेसाठी मोहीम सुरू केली.
सोनोराने सुरुवातीला तिच्या वडिलांचा वाढदिवस ५ जून हा फादर्स डे म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
स्थानिक धर्मगुरूंनी तयारीसाठी अधिक वेळ मागितला. परिणामी, पहिला फादर्स डे १९ जून १९१० रोजी साजरा झाला.
१९३० च्या दशकात, तिने कपडे आणि तंबाखू उद्योगांसह व्यापारी गटांच्या मदतीने आपली मोहीम पुन्हा सुरू केली.
१९७२ मध्ये राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी वडिलांच्या सन्मानार्थ जूनच्या तिसऱ्या रविवारला राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याच्या घोषणेवर स्वाक्षरी केली.
लोक जिवंत वडिलांचा सन्मान करण्यासाठी लाल गुलाब आणि निधन झालेल्या वदिलांच्या आठवणीसाठी पांढरे गुलाब घालत असत.