Hindu Temples in Pakistan| पाकिस्तानमध्ये आहेत प्रसिध्द ऐतिहासिक हिंदू मंदिरे; पहा झलक

shreya kulkarni

आजही पाकिस्तानच्या भूमीवर काही हिंदू मंदिरे श्रद्धा, इतिहास आणि संस्कृतीचा अमूल्य वारसा जपताना दिसतात.

Historical Hindu Temples Pakistan | Canva

पाकिस्तानमधील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक हिंदू मंदिरे

श्री लक्ष्मी नारायण मंदिर (कराची)

सुमारे २०० वर्षे जुने हे मंदिर देवी लक्ष्मी आणि विष्णूंना समर्पित आहे. दिवाळीसारख्या सणांवेळी येथे विशेष पूजा आयोजित केली जाते.

Historical Hindu Temples Pakistan | Wikipedia

गौरी मंदिर (थारपारकर) 

थारपारकर जिल्ह्यातील हे मंदिर हिंदू आणि जैन धर्माच्या एकत्रित वारशाचे प्रतीक आहे.

Historical Hindu Temples Pakistan | Wikipedia

नृसिंह मंदिर / प्रह्लादपुरी मंदिर (मुल्तान)

विष्णूच्या नृसिंह अवताराला समर्पित हे मंदिर असून असे मानल जाते की, येथेच भगवान नृसिंहाने हिरण्यकश्यपाचा वध केला होता.

Historical Hindu Temples Pakistan | Wikipedia

राम मंदिर (सैयदपूर, इस्लामाबादजवळ)

हे प्राचीन मंदिर राजा मानसिंह यांनी इ.स. १५८० मध्ये बांधले होते. आजही हे मंदिर हिंदू संस्कृतीचे प्रतीक मानले जाते.

Historical Hindu Temples Pakistan | Wikipedia

पंचमुखी हनुमान मंदिर (कराची)

कराचीतील हे मंदिर हनुमानाच्या पंचमुखी रूपाला समर्पित आहे. या ठिकाणची मूर्ती सुमारे १५०० वर्षे जुनी असल्याचे मानले जाते.

Historical Hindu Temples Pakistan | Wikipedia

गोरखनाथ मंदिर (पेशावर)

पेशावरमधील हे मंदिर १९४७ नंतर बंद झाले होते. मात्र २०११ मध्ये ते पुन्हा भक्तांसाठी खुले करण्यात आले.स्वामीनारायण मंदिर (कराची)

Historical Hindu Temples Pakistan | Wikipedia

स्वामीनारायण मंदिर (कराची)

कराचीत स्थित हे मंदिर सुमारे १६५ वर्षे जुने आहे. येथे एक धर्मशाळाही आहे, जिथे भाविक निवास करू शकतात.

Historical Hindu Temples Pakistan | Wikipedia

वरुण देव मंदिर (कराची)

समुद्र देवता वरुण यांना समर्पित हे मंदिर १००० वर्षांहून अधिक जुने आहे. हिंदू कौन्सिलने २००७ मध्ये ते पुन्हा सुरु केले.

Historical Hindu Temples Pakistan | Wikipedia

जगन्नाथ मंदिर (सियालकोट)

येथे भगवान विष्णूंच्या जगन्नाथ रूपाची पूजा केली जाते. दरवर्षी येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.

Historical Hindu Temples Pakistan | Wikipedia

हिंगलाज माता मंदिर (बलुचिस्तान)

हे मंदिर ५१ शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. पुराणकथेनुसार, जेव्हा भगवान शंकर सतीचे शव घेऊन तांडव करत होते, तेव्हा तिचे डोके येथे पडले होते.

Wikipedia

ही मंदिरे आजही पाकिस्तानातील हिंदू समाजासाठी श्रद्धास्थान आहेत आणि भारतीय उपखंडातील समृद्ध धार्मिक परंपरेचे साक्षीदार आहेत.

Temple | Canva
येथे क्लिक करा...