'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज १५ मे रोजी ५८ वा वाढदिवस आहे.अजुनही तिच्या आरपसपानी सौंदर्य आणि हास्याने फॅन्स घायाळ होतात .वयाची साठी गाठत आलेली माधुरी स्वत:ला फिट कशी ठेवते .मीडिया रिपोर्टनुसार, माधुरी दिवसभरात ५ ते ६ वेळा थोड्या-थोड्या अंतरानंतर जेवते.भाज्या, नट्स टोफू तसेच उकडलेले, भाजलेले आणि हलका आहार घेते .सकाळी फळे, दलिया वा पोहे, ग्रीन टी, थोड्या वेळाने मुट्ठी भरून बदाम, स्मूदी घेते.दुपारच्या जेवणात भाकरी, डाळ, भाजी, एक वाटी दही खाते.सायंकाळी हर्बल चहा, हलके सॅलड, नट्स खाते .रात्रीच्या जेवणात सूप, ग्रिल्ड भाज्या, खिचडी खाते .भरपूर पाणी, नारळ पाणी, ताजे ज्युस देखील घेते.फिट राहण्यासाठी आऊटडोर एक्सरसाईज, रनिंग, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करते.रोज योगा व आठवड्यातून ४ वेळा कथ्थक प्रॅक्टिस करते.'नाजनीन परी तू स्वर्गातली..' मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडेचं लव्हेंडर फोटोशूट