पुढारी वृत्तसेवा
चिकण वाळू, स्वच्छ पाणी आणि जवळच असलेला कुलाबा किल्ला यामुळे अलीबाग हा महाराष्ट्राचा सर्वात जास्त भेट दिला जाणारा बीच आहे.
कोकणातील सर्वात स्वच्छ बीच म्हणून गणपतीपुळे प्रसिद्ध आहे. मंदिरे, स्वच्छ वाळू आणि हिरवेगार टेकाडे यामुळे पर्यटकांची पहिली पसंती.
तारकर्लीचा क्रिस्टल क्लिअर पाण्यात स्कूबा डायविंग, स्नॉर्केलिंगसारख्या वॉटर अॅक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात केल्या जातात.
धुसर पांढरी वाळू, शांत वातावरण आणि कमी गर्दीमुळे काशी इड बीच कपल्स आणि फॅमिलींसाठी परफेक्ट स्पॉट.
‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाणारे हरिहरेश्वर येथे समुद्र, टेकाडे आणि मंदिर एकत्र पाहायला मिळतात.
दापोलीला 'Mini Mahabaleshwar' म्हणतात. येथे कर्दे, मुरुड आणि लाडघर असे अनेक छोटे सुंदर बीच आहेत.
समुद्राच्या मध्यभागी असलेला जंजिरा किल्ला आणि जवळचा बीच हा एक अद्वितीय अनुभव देतो.
मँगो सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगडचा बीचदेखील कमी गर्दीचा आणि अत्यंत सुंदर आहे.
दिवेआगरमधील सुवर्ण गणपती मंदिर आणि शांत, लांब पसरलेला समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो.