benefits of amla-aloe vera juice : सलग १५ दिवस आवळा-कोरफड रस पिल्याने काय होते?

पुढारी वृत्तसेवा

आवळा आणि कोरफड (एलोव्हेरा) यांचा रस पिण्याचा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. याला अनेकजण 'पॉवर ज्यूस' असेही म्‍हणतात.

आवळा आणि कोरफड रस सलग १५ दिवस नियमितपणे घेतला तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, याबद्दल आपण जाणून घेऊया.

१५ दिवस सातत्याने आवळा-कोरफड रस पिल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यामुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार लवकर होण्याची शक्यता कमी होते.

हे दोन्ही रस पचनक्रिया सुधारतात. त्यामुळे पोटातील सूज, गॅस, बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्यांमध्ये लक्षणीय आराम मिळतो.

या रसाच्या सेवनाने केसांचे गळणे कमी होते. केसांची मुळे मजबूत होतात. यामुळे केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते.

आवळा आणि कोरफडात नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे रक्तातील साखर (ब्लड शुगर लेव्हल) नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

हा रस चेहऱ्यावरील सूज आणि शरीरातील 'वॉटर रिटेन्शन' (पाणी साठून राहणे) कमी करतो, ज्यामुळे चेहरा अधिक ताजा आणि फ्रेश दिसतो.

कोरफड नैसर्गिकरित्या दाह-विरोधी असल्यामुळे सांधेदुखी आणि सांध्यांवरील सूज कमी होण्यास मदत होते.

हा ज्यूस यकृताची स्‍वच्‍छता (डिटॉक्सिफिकेशन) वेगाने करतो. शरीरातील विषारी घटक (टॉक्सिन्स) बाहेर फेकले गेल्यामुळे शरीर हलके आणि उत्साही वाटते.

या रसामध्‍ये असलेल्‍या व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा चमकदार बनते.

येथे क्‍लिक करा.