आपला चेहरा सुंदर व नितळ, तेजस्वी दिसावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते..खासकरून तरुणी आणि महिला सुंदर चेहऱ्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधने वापरतात..चेहऱ्याची त्वचा अतिशय नाजूक असल्याने तिची विशेष काळजी घेणे गरजेचे असते..पण काही घटक चेहऱ्यासाठी घातक ठरू शकतात, हे आपल्याला माहित असायला हवे..सोशल मीडियाच्या माध्यमातून काही घटक चेहऱ्यासाठी वापरा, असं म्हटलं जात. पण ते खरचं सुरक्षित आहेत का?.टूथपेस्ट : टूथपेस्टमध्ये विविध रसायने असतात, जी दातांसाठी सुरक्षित असली तरी त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात .टूथपेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर लालसरपणा, जळजळ आणि कोरडेपणा येऊ शकतो..लिंबाचा रस : लिंबाचा रस आम्लयुक्त असल्यामुळे तो थेट चेहऱ्यावर लावल्यास घातक ठरू शकतो..लिंबाच्या रसाचा घातक परिणाम म्हणजे त्वचा जळजळणे, लाल होणे, तसेच सूर्यप्रकाशात कायमचे काळे डाग पडण्याचीही शक्यता असते. .बेकिंग सोडा : बेकिंग सोडाही चेहऱ्यासाठी घातक आहे, तो त्वचेतील नैसर्गिक तेल पूर्णपणे काढून टाकतो. .बेकिंग सोड्यामुळे त्वचेची सुरक्षा भिंत तुटून अति-कोरडेपणा, जळजळ आणि मुरुमे वाढू शकतात..गरम पाणी : गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल नष्ट होण्याची शक्यता असते..त्वचेतील नैसर्गिक तेल नष्ट झाल्याने कोरडेपणा, जळजळ आणि चेहऱ्यावर रेषा पडू शकतात..येथे क्लिक करा