अविनाश सुतार
लुप्त झालेला डोडो पक्षी आपण पुन्हा पाहू शकणार आहे
300 वर्षांनंतर या पक्ष्याला पुन्हा आणण्यासाठी शास्त्रज्ञांनी 120 दशलक्ष डॉलर्स खर्च केले आहेत
डोडो पक्ष्याला पुन्हा आणण्यासाठी कोलॉसल बायोसाइंसेस इंक ही एक अत्याधुनिक बायोटेक्नॉलॉजी कंपनी काम करत आहे
ही कंपनी लुप्त झालेल्या प्रजाती पुन्हा निर्माण करण्यावर काम करत आहे
कंपनीचे सीईओ बेन लॅम यांनी ब्लूमबर्गला सांगितले की, आम्ही डोडो पक्ष्याला पुन्हा आणण्याच्या मार्गावर लक्षणीय प्रगती करत आहोत
या कंपनीने अनेक गुंतवणूकदारांकडून 120 दशलक्ष डॉलर्सची निधी जमा केला आहे
एक्सवर कंपनीने एक व्हिडिओ शेअर केला असून डोडो पक्षी पुन्हा आणण्याच्या त्यांच्या उद्दिष्टाविषयी सांगितले आहे
डोडोला परत आणण्याच्या या प्रोजेक्टमध्ये फिल्ममेकर पीटर जॅक्सन देखील आहेत
जीन संपादित पक्ष्यांपासून ते पहिल्या कबूतर प्राथमिक गर्भकोषांपर्यंत कंपनीने काम सुरू केले आहे