पुढारी वृत्तसेवा
अनेकांना वाटते की जास्त तेल लावल्याने केस मजबूत होतात. पण प्रत्यक्षात जास्त तेल केस गळतीचे कारण ठरू शकते.
खूप तेल लावल्यामुळे टाळूवरील रोमछिद्रे बंद होतात. त्यामुळे केसांच्या मुळांना हवा मिळत नाही.
तेल जास्त असल्यास टाळूवर धूळ साचते, कोंडा वाढतो आणि सतत खाज सुटते.
जास्त तेलामुळे केस चिकट होतात. त्यामुळे मुळांवर ताण येतो आणि केस तुटतात.
तेलकट टाळूवर बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याची शक्यता जास्त असते.
तेल जास्त असल्याने शॅम्पू करताना केस अधिक प्रमाणात गळतात.
कोरड्या केसांसाठी आठवड्यातून २ वेळा तेल पुरेसे असते. रोज तेल लावणे चुकीचे आहे.
फक्त मुळांवर हलक्या हाताने तेल लावावे, संपूर्ण केस तेलात बुडवू नयेत.
मर्यादित आणि योग्य पद्धतीने तेल लावल्यासच केस मजबूत, चमकदार आणि निरोगी राहतात.