पुढारी वृत्तसेवा
घोरणे ही सामान्य वाटणारी पण महत्त्वाची समस्या
घोरणे ही अनेकांना साधी समस्या वाटते, मात्र मेडिकल सायन्सनुसार ती काही गंभीर आजारांची सुरुवात असू शकते.
पुरुषांमध्ये घोरण्याचं प्रमाण जास्त का?
वैद्यकीय अभ्यासानुसार पुरुषांमध्ये घोरण्याचं प्रमाण महिलांच्या तुलनेत जास्त आढळतं. यामागे शारीरिक रचना आणि हार्मोन्स कारणीभूत ठरतात.
घशाच्या रचनेचा परिणाम
पुरुषांच्या घशातील स्नायू आणि श्वसनमार्ग महिलांच्या तुलनेत अधिक सैल असतात. झोपेत हे स्नायू सैल झाल्यावर श्वसनात अडथळा निर्माण होतो आणि घोरणे होते.
हार्मोन्सची भूमिका महत्त्वाची
महिलांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन हे हार्मोन्स श्वसनमार्ग मजबूत ठेवतात. त्यामुळे तरुण वयात महिलांना घोरण्याचा त्रास तुलनेने कमी दिसतो.
वजन वाढल्याने घोरणं वाढतं
पुरुषांमध्ये पोटाभोवती आणि मानेजवळ चरबी साचण्याचं प्रमाण जास्त असतं. यामुळे श्वसनमार्ग अरुंद होतो आणि घोरण्याची शक्यता वाढते.
महिलांमध्ये घोरणं कधी वाढतं?
मेनोपॉजनंतर महिलांमधील हार्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळे त्या काळात महिलांनाही घोरण्याचा त्रास सुरू होऊ शकतो.
घोरणं गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं
सतत आणि जोरात घोरणं हे स्लीप अॅपनिया या आजाराचं लक्षण असू शकतं, ज्यामध्ये झोपेत श्वसन थांबण्याची शक्यता असते.
आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
घोरण्यामुळे झोप पूर्ण होत नाही, दिवसभर थकवा जाणवतो, एकाग्रता कमी होते आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
वेळीच उपचार महत्त्वाचे
घोरणं नियमित होत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल केल्यास ही समस्या नियंत्रणात येऊ शकते.