शर्टाची बटणं लावा...; प्लेबॉय मॉडेलला विमानात चढण्यापूर्वीच थांबवलं आणि...

पुढारी वृत्तसेवा

माजी प्लेबॉय मॉडेल सारा ब्लेक चीक हिने अमेरिकन एअरलाइन्सवर गंभीर आरोप केले आहेत.

विमानात चढण्यापूर्वी फ्लाइट अटेंडंटने तिला अयोग्य कपडे असल्याचे सांगत तिला शर्टाचे बटण लावण्यास सांगितले.

३४ वर्षीय चीकने सांगितलं की, हा प्रकार अटलांटा येथे प्रवास करत असताना घडला. तिने संपूर्ण अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.

साराच्या म्हणण्यानुसार, फ्लाइट अटेंडंटने तिला सांगितलं की, जर तिचे स्तन मोठे असतील, तर ती ॲथलेटिक कपडे घालू शकत नाही.

यावर साराने अमेरिकन एअरलाइन्सच्या ड्रेस कोडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोशल मीडियावर अनेकांनी साराच्या बाजूने मत मांडले.

“इतर महिलांनीही असेच कपडे घातले होते, पण मला मात्र थांबवलं,” असा दावा चीकने केला.

या प्रकरणानंतर अमेरिकन एअरलाइन्सने माफी मागितली.

'आमच्याकडे ग्राहक आणि क्रू मेंबर दोघांबद्दलही आदराची संस्कृती आहे. या घटनेबद्दल आम्ही दिलगीर आहोत' असे म्हणत अंतर्गत चौकशी करण्याची ग्वाही दिली.

अमेरिकन एअरलाइन्सच्या नियमांनुसार, आक्षेपार्ह कपड्यांना परवानगी नाही, योग्य कपडे घालण्याचा' सल्ला दिला जातो.

“याच कपड्यांमुळे मला थांबवलं,” असं चीकने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

Bill Belichick Jordan Hudson photos | Bill Belichick Jordan Hudson Instagram
असंही प्रेम! ७३ वर्षांचे प्रशिक्षक, त्यांची २४ वर्षांची प्रेयसी; पाहा जबरदस्त रोमँटिक फोटो