shreya kulkarni
'Evil Eye' म्हणजे दुष्ट नजर, जी कोणाच्यातरी सौंदर्य, यश किंवा संपत्ती पाहून निर्माण होते. ही नजर एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर किंवा आयुष्यावर वाईट परिणाम करू शकते, असं मानलं जातं.
ही डोळ्यासारखी आकृती निळ्या, पांढऱ्या आणि काळ्या रंगात असते. निळा रंग शांती आणि संरक्षणाचं प्रतीक मानला जातो. या ताबीजाने नकारात्मक ऊर्जा परावर्तीत होते, असं मानलं जातं.
भारत, तुर्की, ग्रीस, इजिप्त, मेक्सिको, अफगाणिस्तान, स्पेन यांसारख्या देशांत प्रचलित. तुर्कीमध्ये याला ‘नाजर’ म्हणतात आणि नवजात बाळांपासून गाड्यांपर्यंत सगळीकडे हे वापरलं जातं.
ब्रेसलेट, पायल, लॉकेट, अंगठी, घराच्या दरवाज्यावर, कीहोल्डर किंवा भिंतीवर याचा – वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी उपयोग होतो
प्राचीन ग्रीस, रोम आणि इस्लामिक ग्रंथांमध्येही याचा उल्लेख आढळतो. हिब्रू, बौद्ध आणि हिंदू परंपरांमध्येही ‘नजर लागणे’ ही संकल्पना आहे.
विज्ञान या संकल्पनेला समर्थन देत नाही. पण लोकांमध्ये मानसिक स्थैर्य आणि सुरक्षिततेचा भाव निर्माण होतो.
बरेच बॉलिवूड व हॉलिवूड सेलिब्रिटी एविल आय ज्वेलरी वापरतात. त्यामुळे आज ती अंधश्रद्धा असूनही एक फॅशन ट्रेंड म्हणूनही पाहिली जाते.