स्वालिया न. शिकलगार
एप्सम सॉल्टमध्ये भरपूर मॅग्नेशियम असते
या मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास स्नायूंचा कडकपणा, सांधेदुखीपासून आराम मिळतो
एप्सम सॉल्ट मिश्रित पाण्याने अंघोळ केल्यास शरीरात 'सेरोटोनिन' (आनंद देणारे संप्रेरक) तयार होते
ज्यामुळे मानसिक थकवा आणि ताण दूर होतो
कोमट पाण्यात थोडे एप्सम सॉल्ट टाकून त्यात १०-१५ मिनिटे पाय बुडवून ठेवा
यामुळे पायांची सूज उतरते, टाचांना आराम मिळतो आणि पायांची दुर्गंधीही दूर होते
हे मीठ मृत त्वचा काढून टाकण्यासाठी उत्तम स्क्रब म्हणून काम करते
खोबरेल तेलात थोडे सॉल्ट मिसळा. चेहऱ्याला, शरीराला मसाज केल्यास त्वचा चमकदार होते