Eng vs Aus : जो रुटच्या नावावर नोंदवला गेला लाजिरवाणा विक्रम

पुढारी वृत्तसेवा

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट नवा विक्रमवीर आहे. कसोटी क्रिकेटमध्‍ये त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे.

जो रुटने ऑस्ट्रेलियामध्ये अखेरीस शतक झळकावले असले तरी, आता एक निराशाजनक विक्रमाची त्‍याच्‍या नावावर नोंद झाली आहे.

आता ऑस्ट्रेलियात सर्वाधिक सामने पराभूत होण्याच्या संघात समावेश असणारा खेळाडू असा नामुष्कीजनक विक्रम जो रुटच्या नावावर झाला आहे.

नुकत्‍याच ऑस्ट्रेलियात झालेल्या ॲशेस मालिकेत इंग्लंडला ऑस्ट्रेलियाकडून ४-१ ने पराभव पत्करावा लागल्यानंतर रुटच्या नावावर हा लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.

क्रिकेटच्या इतिहासात परदेशात सर्वाधिक कसोटी सामने गमावण्याचा विक्रम आता जो रुटच्या नावावर झाला आहे.

जो रुटचा अशा संघात समावेश होता ज्याने ऑस्ट्रेलियामध्ये १६ सामने गमावले आहेत.

यापूर्वी जेम्स अँडरसन आणि ॲलिस्टर कूक यांच्या नावावरही प्रत्येकी १५ वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झालेल्या संघात समावेश होता.

या यादीतील पहिला गैर-इंग्लिश खेळाडू म्‍हणून भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा समावेश होता. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये १४ सामन्यांत पराभव पत्करला होता.

येथे क्‍लिक करा.