Diet Plan : थकवा दूर ठेवायचा आहे? जाणून घ्या नैसर्गिक ऊर्जा वाढवणारा आहार

पुढारी वृत्तसेवा

दिवसभर तुम्‍हाला नैसर्गिक ऊर्जा मिळवण्‍यासाठी आहारात काही बदल करणे आराेग्‍यासाठी फायदेशीर ठरते.

पोटॅशियम, जीवनसत्त्वे यांनी समृद्ध असलेली केळी दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा प्रदान करतात.

बदाम, काजू, भोपळ्याच्या बिया आणि चिया बियांमध्ये आरोग्यदायी फॅट्स, प्रथिने आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते.

पालक आणि कॉलरड ग्रीन्स लोह युक्त असतात. याचा आहारात समावेश केल्‍याने पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत होते

फॅटी मासे सॅल्मन, टूना आणि मॅकरेलमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड भरपूर असतात. ते हृदयाचे आरोग्यासह ऊर्जाही वाढवतात.

रताळी आणि बटाट्याचाच आहारात समावेश करणे  ऊर्जा सोडण्यास मदत करतात.

प्रथिनेयुक्त अंडी, ग्रीक दही आणि कमी चरबीचे मांस ऊती तयार करण्यास आणि त्यांची दुरुस्तीस पूरक ठरतात.

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेला ग्रीन टी ऊर्जा वाढवतो.

संत्री आणि लिंबू व्हिटॅमिन सीने परिपूर्ण असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा वाढण्यास मदत होते.

टीप :ही माहिती केवळ मार्गदर्शन म्हणून विचारात घ्यावी.कोणत्याही घरगुती उपायांचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

येथे क्‍लिक करा.