Anirudha Sankpal
महिला कर्मचाऱ्याला ऑफिसला जवळपास ४० मिनिटे लवकर आल्यामुळं आपली नोकरी गमवावी लागली आहे. विशेष म्हणजे न्यायालयानं देखील कंपनीचीच बाजू घेतली.
२२ वर्षाची स्पेनमधील महिला कायम ऑफिसला सकाळी ६.४५ ते ७ च्या दरम्यान पोहचत होती. तिची ऑफिस टाईम सकाळी ७.३० असल्यानं कंपनीच्या मालकानं तिला लवकर येण्यावरून सतत वॉर्निंग दिली होती.
कंपनीने त्या महिला कर्मचाऱ्याला सकाळी वेळेआधी ऑफिसला न येण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. मात्र दोन वर्षे तिला काम न देताही ती ऑफिसला लवक येत राहिली.
शेवटी बॉसने तिला गैरवर्तनाचा ठपका ठेवत नोकरीवरून काढून टाकले. यावेळी तिचा कामात कोणताच सहयोग नसतो आणि ती दिलेल्या स्पष्ट सुचना देखील पाळत नसल्याचं कारण देखील देण्यात आलं.
यानंतर संबंधित महिलेने या विरोधात न्यायालयात तक्रार केली. मात्र न्यायालयाच्या देखील लक्षात आलं की ही महिला ऑफिसला पोहचण्याआधीच कंपनी अॅपच्या माध्यमातून लॉग इन करत होती.
कंपनीने तिच्यावर परवानगीशिवाय कंपनीच्या गाड्यांच्या बॅटरी परस्पर विकल्याचा देखील आरोप ठेवला होता.
त्यानंतर न्यायालयानं कंपनीचा तिला काढून टाकण्याचा निर्णय योग्य असल्याचा निर्णय दिला.
यावेळी न्यायालयानं तिच्या अती वक्तशीरपणा महत्वाचा नाही तर तिने कामाच्या ठिकाणाचे नियम पाळले नाही. तिने स्पॅनिश कामगार कायद्यातील कलम ५४ चे उल्लंघन केले आहे असं मत नोंदवलं.