Namdev Gharal
अस्वलांचे जगात ८ प्रमुख प्रकार (Species) आढळतात. प्रत्येकाचे राहणीमान, दिसणे, आहार आणि वर्तन वेगवेगळे असते.
1) ब्राउन बेअर (Brown Bear / ग्रिझली बेअर) हा अस्वलामधील सर्वात मोठा प्रकार असून हा उत्तर अमेरिका, युरोप, रशिया या थंड प्रदेशात आढळतो वजन: 150–600 kg तर उंची 1–2.8 मीटर असते हा ताकदवान व वेगवान असतो
2) अमेरिकन ब्लॅक बेअर अमेरिका, कॅनडा देशाता आढळणारे हे अस्वल 90–300 kg पर्यंत असेत रंग याचे वैशिष्ट्ये म्हणजे झाडांवर चढण्यात अत्यंत पटाईत. शांत स्वभावाचे असते.
3) ध्रुवीय अस्वल (Polar Bear)हे आर्क्टिक प्रदेशात आढळणोर मोठ्या आकाराचे अस्वल आहे यातील नराचे वजन 350–700 असते. हे मांसाहारी अस्वल.संपूर्ण शरीरावर जाड पांढरी फर तसेच पोहण्यात पटाईत असते.
4) एशियाटिक ब्लॅक बेअर भारत, चीन, जपान या देशात आढळणारे हे अस्वला 60–200 kg पर्यंत वजनाचे असते याची ओळख: छातीवर चंद्रकोरीसारखा पांढरा चिन्ह (V shape). झाडांवर चढण्यात तरबेज.
5) सन बेअर (Sun Bear) दक्षिण-पूर्व आशिया दिसनारे हे अस्वल सर्वात लहान अस्वल आहे. याचे वजन: 25–65 किलापर्यंत असते हे सर्वात छोटे व चपळ अस्वल. आपल्या लांब जीभेने मध खाण्यात पटाईत
6) स्लॉथ बेअर (Sloth Bear / भालू) भारतात श्रीलंका येथे हे प्रामुख्याने आढळते याचे वजन: 55–145 kg ओळख: काळी लांब केसाळ फर छातीवर पांढरा "Y" किंवा "V" आकार स्वभावाने थोडे आक्रमक.
7) जायंट पांडा (Giant Panda) चीनचा राष्ट्रीय प्राणी असलेला पांडा आता फक्त संरक्षीत क्षेत्रात आढळतो याचे वजन 70 ते 160 किलोपर्यंत असते याच्या आहारात ९९% बांबू असतो. पाने लहान कोंब हे खातात
8) स्पेक्टॅक्ल्ड बेअर दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतात हे डोळ्याभोवती चष्म्यासारखे पांढरे डिझाईन असलेले अस्वल आढळते हे शाकाहारी असते.