Kiwi Bird Egg |आपल्या अर्ध्या वजनाचे अंडे देणारा पक्षी, याला हवेतही उडता येत नाही

Namdev Gharal

पक्षी व त्‍यांची अंडी ही सर्वसाधारण त्‍याच्या वजनाच्या 2 ते 8 टक्के इतकी लहान असतात. पण असा एक पक्षी आहे ज्याचे अंडे त्‍यांच्या वजनाच्या 20 ते 30 टक्के इतके असते

हा पक्षी आहे न्युझिलंडचा राष्ट्रीय पक्षी किवी, उडू न शकणारा पक्षी आहे. त्याचे पंख खूपच लहान असतात

कीवीचे वजन साधारण 1 ते 3.5 किलो तर उंची उंची अंदाजे 25–45 सेमी असते

पण अंड्याचा विचार करता किवी हा पक्षी जगातील कोणत्याही पक्ष्याच्या तुलनेत सर्वात मोठे अंडे शरीराच्या वजनाच्या प्रमाणात घालणारा पक्षी आहे.

एका मध्यम आकाराच्या कीवीचे (1 ते 2 किलो) अंडे साधारण 12–20 सेमी लांबीचे आणि वजन 300–500 ग्रॅम असू शकते.

इतर बहुतेक पक्ष्यांच्या तुलनेत कीवीचा वास घेण्याचा सेन्स खूप जास्स असतो. रात्री शोधाशोध करून कीवी अन्न मिळवतो — कीटक, गांडुळे, फळे इत्‍यादी त्‍याचे खाद्य असते

अजून या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे मादीने अंडे घातल्यानंतर नर कीवी ते उबवण्याचे काम करतो.

विकसीत अंड्यामध्ये फारच मोठ्या प्रमाणात पोषकतत्त्वे असतात. पिल्लू जन्मताना खूप विकसित अवस्थेत असते — जवळपास स्वतंत्र राहू शकते

त्यामुळे अंडे बाहेर आल्यानंतर पिल्लाला फार काळ पालकांवर अवलंबून राहावे लागत नाही.

किवीच्या शरीरावर केसासारखी पिसे असतात तसेच वास घेण्याची क्षमताही इतर पक्ष्यांपेक्षा जास्त.