महाराणा प्रताप यांचा चेतक ते भारतीय इतिहासाचे वैभव ‘मारवाडी घोडा’

Namdev Gharal

भारतीय इतिहासाची शान व अनेक युद्ध प्रसंगात आपल्या राजाची शेवटपर्यंत साथ देणारा रुबादार घोडा म्हणजे मारवाडी ब्रीड

हा भारतातील सर्वात प्रसिद्ध, राजेशाही आणि अद्वितीय घोड्यांच्या जातींपैकी एक आहे. राजपूत योद्धा महाराणा प्रताप यांचा चेतक घोडा इतिहासात अजरामर झाला आहे.

पूर्वी राजपूत योद्ध्यांचे प्रमुख युद्धघोडे हे मारवाडीच होते. युद्धात तलवार, वीज यांच्या आवाजाने हा अजिबात घाबरत नाही.

त्याचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे याचे आत वळलेले कान (inward-curved ears) अशी रचना जी इतर कोणत्याही जातीमध्ये दिसत नाही

ही रचना जगात फक्त या जातीमध्येच दिसते. कानांची ही वक्रता केवळ आकर्षक नसून, ती वाऱ्याचा आणि आवाजाचा अचूक दिशानिर्देश समजण्यास मदत करते.

मारवाडी घोड्याची उत्पत्ती राजस्थानातील मारवाड प्रदेशात (जोधपूर, नागौर, जालोर, पाली) 12 व्या शतकात झाली. स्थानिक घोडे व अरबी घोड्यांच्या संकरातून हे ब्रीड तयार करण्यात आले.

काळा, पांढरा, राखाडी, तांबूस, चेस्टनट या रंगात हा आढळतो. तसेच वजन 400 ते 500 किलो असून उंची साडेपाच फूटापर्यंत असते

रुबाबदार पणात याचा कोणीही हात धरु शकणार नाही, उंची चपळता देखणेपणामुळे अनेक सोहळयांमध्ये याला सहभागी केले जाते.

युद्धभूमीवर त्यांची शौर्य, निष्ठा आणि बुद्धिमत्ता प्रसिद्ध होती असे म्हटले जाते की, हा घोडा मालकाचा जीव वाचवण्यासाठी स्वतः जीव देण्यासही तयार असतो.

आज मारवाडी घोडा लग्नसोहळे, पोलो, शो जंपिंग आणि राजेशाही शोमध्ये वापरला जातो. तो भारतीय परंपरेचा प्रतीक म्हणून गौरवला जातो.