Egg Yolk Myth: अंड्याचा पिवळा बलक फेकून देताय...? डॉक्टर म्हणतात मोठी चूक करताय

Anirudha Sankpal

अंड्याला आरोग्यासाठी 'गोल्ड स्टँडर्ड प्रोटीन' मानले जाते, कारण यामध्ये शरीराला आवश्यक असलेले सर्व ९ गरजेची अमाइनो ॲसिड असतात.

लोकांमध्ये असा मोठा गैरसमज आहे की अंड्याचा पिवळा भाग (Egg Yolk) खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढून हार्ट अटॅक येतो, पण यात काहीही तथ्य नाही.

आपल्याकडे ब्रेड पकोडा, फाफडा, खाकरा, ढोकळा यांसारख्या पदार्थांनी कोलेस्टेरॉल वाढते, पण विनाकारण अंड्याच्या पिवळ्या भागाला बदनाम केले जाते.

अंड्याच्या केवळ पांढऱ्या भागात (Egg White) फक्त ३ ग्रॅम प्रोटीन असते आणि त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही पोषक घटक नसतात.

सर्व मुख्य आणि महत्त्वाची पोषक तत्त्वे ही अंड्याच्या पिवळ्या भागातच सामावलेली असतात.

अंड्याच्या पिवळ्या भागात विटामिन B12, विटामिन A, विटामिन D, सेलेनियम आणि मँगनीज मुबलक प्रमाणात आढळते.

यामध्ये असलेले 'ल्युटीन' आणि 'झियाझांथिन' हे दोन महत्त्वाचे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

पिवळ्या बलकात 'कोलीन' नावाचा घटक असतो, जो फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी उत्तम मानला जातो.

हाच कोलीन घटक माणसाच्या मेंदूच्या आरोग्यासाठी (Brain Health) आणि त्याच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहे.

येथे क्लिक करा